1
लूक 13:24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
लूक 13:11-12
तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्त झाली आहेस.”
3
लूक 13:13
त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.
4
लूक 13:30
आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”
5
लूक 13:25
घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावत म्हणू लागाल, ‘प्रभो, आमच्यासाठी दार उघड.’ तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही.’
6
लूक 13:5
मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”
7
लूक 13:27
परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’
8
लूक 13:18-19
ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात लावला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांवर राहू लागले.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo