1
लूक 6:38
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही द्याल, त्याच मापाने तुम्हांला परत देण्यात येईल.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
लूक 6:45
चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे, ते मुखावाटे निघणार.
3
लूक 6:35
तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. त्यांचे बरे करा. परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या म्हणजे तुम्हांला महान पारितोषिक मिळेल आणि तुम्ही परमेश्वराची मुले व्हाल कारण कृतघ्न व वाईट लोकांनाही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो.
4
लूक 6:36
जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू व्हा.
5
लूक 6:37
तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमा मिळेल.
6
लूक 6:27-28
परंतु तुम्हां ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
7
लूक 6:31
लोकांनी तुमच्याबरोबर जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही वर्तन करा.
8
लूक 6:29-30
जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा कोट हिरावून घेतो त्याला तुझा शर्टदेखील घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. जो कोणी तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझे हिरावून घेतो, त्याच्याकडून ते परत मागू नकोस.
9
लूक 6:43
चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही. तसेच वाईट झाडाला चांगले फळ येत नाही.
10
लूक 6:44
कारण प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाही.
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo