1
योहान 8:12
मराठी समकालीन आवृत्ती
येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
योहान 8:32
मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.”
3
योहान 8:31
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.
4
योहान 8:36
म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
5
योहान 8:7
ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.”
6
योहान 8:34
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे.
7
योहान 8:10-11
मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कोठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?” ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo