1
1 करिंथ 13:4-5
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:4-5
2
1 करिंथ 13:7
प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:7
3
1 करिंथ 13:6
ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:6
4
1 करिंथ 13:13
सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:13
5
1 करिंथ 13:8
प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:8
6
1 करिंथ 13:1
मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:1
7
1 करिंथ 13:2
संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:2
8
1 करिंथ 13:3
मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:3
9
1 करिंथ 13:11
मी मूल होतो, तेव्हा माझे बोलणे, माझ्या भावना व माझे विचार मुलासारखे असायचे. आता प्रौढ झाल्यावर मी बालिशपणा सोडून दिला आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 13:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ