नंतर मी स्वर्गात उच्च वाणी ऐकली, तिने जाहीर केले, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार प्रगट झाली आहेत! कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली फेकण्यात आला आहे.