1
प्रकटी 21:4
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटी 21:4
2
प्रकटी 21:5
तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो!” तो मला असेही म्हणाला, “लिही, कारण ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत.”
एक्सप्लोर करा प्रकटी 21:5
3
प्रकटी 21:3
मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:3
4
प्रकटी 21:6
तो पुढे म्हणाला, “झाले! मी पहिला व शेवटचा, प्रारंभ व अंत आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी विनामूल्य देईन.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:6
5
प्रकटी 21:7
जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:7
6
प्रकटी 21:8
परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”
एक्सप्लोर करा प्रकटी 21:8
7
प्रकटी 21:1
नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:1
8
प्रकटी 21:2
तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:2
9
प्रकटी 21:23-24
नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील.
एक्सप्लोर करा प्रकटी 21:23-24
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ